kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, April 6, 2022
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे.
जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर येईल.
एका गरीब सामान्य कुटुंबातील ही कथा आहे.
समाजातील व्यथा,जाणीव,परिस्थिती...या सगळ्या गोष्टी चां मेळ या मधे आपणास पाहायला मिळेल. चला तर मग कथा सुरू करू.
कथेचं नाव आहे.." व्यथा मायलेकीची "
एका खेडे गावात दामू आणि त्याचा परिवार राहत होता. दामू मोल मजुरी करून घर चालवत असे.
त्याची पत्नी तारा बाई..ती ही शेतातील खुरपणी करत असे.त्यांना दोन मुलीच होत्या.
मोठी निता,आणि तिच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान सुरेखा. नीता 7 वी मध्ये शिकत होती,सुरेखा पाचवी मध्ये. दामू ला दारू चे व्यसन होते.
पण तरी ही दामू कसा बसा घर चालवत होता.
तारा बाई ही रानात शेतात मजुरी साठी जात असे.
एके दिवशी दामू दारू पिऊन घरी आला,आणि तारा शी भांडू लागला,त्या वेळी शाळेतून दोन्ही मुली रडत घरी आल्या...
मुली रडत= आई बाबा आम्हाला शाळेतून घरी धाडले...परीक्षेचे पैसे भरले नाहीत म्हणून...दोन्ही मुली रडू लागल्या.
तारा ने त्यानं पदरात बांधलेले फुटाणे दिले आणि त्यांना शांत केले,
तारा.= पोरीनो रडू नका, म्या भरिन तुमची साळ ची फी....नका रडू अभ्यास करा..उद्या भरीन म्या .
तारा दामू ला बोलू लागली भांडू लागली,
तारा = काय व...माझ्या संसराच वाटोळे केले दारू पिऊन,आता पोरांच्या आयुष्याचं वाटोळं नका करू ,कमाल जा दारू ढोसू नका.
दामू = अग तारा मला बी कळतंय ग,पण माझी दारू काय सुटणा...मी काय करू ग...माझ्या मूळ
तुमच्या सर्वांचा वनवास झाला. आता न्हाय हु देणार...मी रोज कामाला जाईन, तारे आपल्या पोरींना लय शिकवायच....मोठ करायचे.. माझं सपान हाय बग.
तारा = व्हय व्हय ...उद्या जा कामा ला....भाकरी दिती करून.
सगळे बरे चालले होते,म्हणतात ना चांगल्या घराला आणि संसाराला कोणाची नजर न लागो.
काही वर्षे लोटली ,मुली आता मोठ्या कळत्या झाल्या... मुली सकाळी शाळेत जायला निघाल्या. पायात चप्पल न्हवती...उन्हाचा कडाका होता. सुरेखाचे पाय पोळू लागले.सुरेखा ला रडू कोसळले. नीता ने तिला धीर दिला...
आणि निता ची नजर रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कापडी पिशवी वर पडली...व ती पिशवी तिने फाडली आणि दोघींच्या पायाला गुंडाळली...
नीता = सुरे आता रडु नको आई ला सांगते तुला चप्पल घ्यायला तो पर्यंत आपली चप्पल हीच ग.
कापडाची चिंधी बांधून दोघी शाळेत गेल्या.दोघी ही खूप हुशार होत्या. शाळेतील अनेक मुली मुले त्यांना हसत असत...चेष्टा करत असत.
दामू कामाला जात असताना त्याला मागून गाडीची जोरदार धडक बसते...दामू खाली रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो,
काही लोक त्याला हॉस्पिटल मधे घेऊन जातात
हिकडं तारा शेतात काम करत होती. एका गावातल्या माणसाने तिला ती बातमी दिली,
तिच्या पाया खालची जमीन सरकली.
मुली शाळेत शिकत होत्या ,त्यांना ही बातमी दिली. मुली व तारा हॉस्पिटल मधे येतात.
डोक्याला जबर मार लागल्यामुळे दामू ची तब्बेत
खूपच नाजूक होती. डॉक्टर नी देवाकडे बोट दाखवले. तारा आणि मुली आकांताने रडू लागल्या.
( दामू ची तब्बेत खूपच नाजूक होती दोन ते तीन दिवस दामू ने काढले, आणि चौथ्या दिवशी दुःखाचा डोंगर फुटला दामू हे जग सोडून गेला)
(काय सांगावी ती मयालेकिंची अवस्था... तारा च्या पाया खालची जमीन सरकली..मुली आकांताने ओरडू रडू लागल्या...दामू गेल्याच दुःख खूप मोठं होत,)
दामू घराचा आधार होता. आणि आता तो आधार गेला होता. तारा ला आता खूप एकटे वाटू लागले.घर,मुलींचं शिक्षण आता कसे करायचे हा प्रश्न तिला पडू लागला.
काही वर्षे अशीच दुःखात लोटली, पण तारा ने तिची मुलींना शिक्षण द्यायची जिद्द सोडली नाही.
मुली ही आता खूप मोठ्या झाल्या, तारा ही आता
उतरत्या वयात आली होती.
दामू गेल्या नंतर तिघी मयालेकिनी खूप हलाखीत दिवस काढले होते. आता मुलींचं कॉलेज पूर्ण झाले होते....
नीता ची पोलिस भरती जवळ आली होती,
आणि सुरेखा चा एलएलबी चा रिझल्ट होता.
नीता = आई ...उद्या माझी भरती पुणे होईल मला सिलेक्ट करतील मला आई शहरात गेले पाहिजे.
अन् सुरी ला पण जायचं आहे...तिचा निकाल आहे ती वकील होईल ग आई.
तारा = अग पोरींनो जा लवकर उद्या...माझा आशीर्वाद आहे, बाबांचा पण आशीर्वाद हाय तुम्हांला...लय मोठ व्हा....( ताराच्या डोळ्यातून पाणी येते)
वडीलांच्या माघारी तारा ने मुलींना खूप कष्ट करून शिकवले होते,खूप काबाड कष्ट घेतले होते.
वयानुसार तारा ची तब्बेत ही नाजूक होत होती.
तिने तिच्या शरीराला झालेल्या जखमा मुलींना दाखवल्या न्हवत्या.
त्या रात्री तारा ला खूप ताप आला होता,
तारा तापाने आणि वेदनेने व्याकूळ होती.
तिला दम्याचा त्रास ही होत होता. पण तारा ने मुलींना जरा ही भनक लागू दिली नाही.
मुलींना सांगावे तर मुली शहरात जाणार नाहीत.
माझीच काळजी करत बसतील. तारा तशीच झोपून राहिली.
दिवस उजाडला दोन्ही मुली तयार झाल्या.
आई ने पदरात बांधून ठेवलेले पैसे मुलींना दिले.
सगळी तयारी झाली मुली bag घेऊन निघाल्या.
नीता = आई जाते ग....( रडत) आई आम्ही आठ ते दहा दिवसांनी येईन...तू वेळेवर जेव काळजी घे...आई तू खूप केलंस ग आमच्या साठी.
सुरेखा = आई जाते ग...( रडत मिठी मारली)
आई काळजी घे....आम्ही लगेच येऊ...आणि आता आपले सगळे कष्ट संपणार आहेत.तू शेतात अजिबात जायचं नाही...तुझी लेक वकील होणार आहे.
( तारा दोघी लेकिंना घट्ट मिठी मारते.व तिघी ही रडू लागतात,बस येते मुली गाडीत बसतात.आणि आई चा निरोप घेतात)
चार दिवस झाले मुली जाऊन तारा ला दम्याचा त्रास होऊ लागला, तारा वेदनेने विव्हळत होती,व्याकूळ होती. तरी ती तिच्या मुलींसाठी दिवस ढकलत होती. मुलींना खूप मोठं झालेलं पहायचं होतं तिला.
गावातले शेजारी लोक तारा ला बोलू लागले की तारा तुझी तब्बेत खूपच खराब आहे.लवकर दवाखान्यात जायला हवे.मुलींना फोन करूया का तुझ्या.
त्या गोष्टीस तारा ने साफ नकार दिला. अजिबात नाही...कोणी ही माझ्या लेकींना फोन करायचा नाही.त्यांना काही ही सांगायचे नाही.माझी आन आहे तुम्हास.
त्यांना काही सांगू नका नाही तर त्या आहे तशा सर्व टाकून येतील..त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं मला पहायचं आहे.
असे तारा लोकांना म्हणाली,
आज खूप आनंदाचा दिवस... निता पोलिस भरती मधे पात्र ठरली, निता खूप खुश होती,
इकडे सुरेखा ही llb मधे वकीलीस पात्र ठरली.
दोघी मुली ही खूप खुश आनंदी होत्या.
ही बातमी आई ला कधी जाऊन सांगते असे नीता ला वाटू लागले.
दोघी ही गावाला जायला निघाल्या. आई साठी नवीन साडी घेतली,व दोघी आनंदात गावी जाण्यासाठी निघाल्या.
मुली गावात पोचल्या....गावातून घरासमोर आल्या...बघतात तर काय?
घरा बाहेर मोठी गर्दी झालेली. सगळे लोक जमा झालेले. मुली धावत घराकडे गेल्या....
बघतात तर काय तारा निपचित पडलेली...अगदी कायमची.. ( तारा हे जग सोडून गेली होती)
दोन्ही मुलींनी आई ला पाहताच हंबरडा फोडला.. मुली जोरजोरात रडू लागल्या...
आई....उठ ना...आई....आई बग तुझ्या लेकी आल्यात...आई आम्ही खूप मोठ्या झालो ग..
आई आमचं कौतुक कर ना,आई उठ ना..
मुली जोरात रडू लागल्या. मुलींना खूप दुःख झाले. लोकांनी मुलींना सावरले...आणि तारा ची अंत यात्रा निघाली...
आयुष्यभर तिची ,
कष्टाने काया झिजली,
मुलांच्या सुखासाठी ती,
आज कायमची निजली.
समाप्त.
कथा लेखन. (कवी लेखक)
सुरज प्रल्हाद माने.
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...