Follow me

Sunday, November 28, 2021

वेळ दे रे....( तिची व्यथा)

सख्या सजणा मला वेळ दे रे, मनातून मला समजून घेरे, रोज थोडा तरी मज वेळ दे रे, त्या वेळ साठी तरस ते रे, नको पैसे नको ती संपत्ती रे, पैसे मी ही कमवते रे, ऑफिस मधून मी आली की, तुझीच वाट पाहते रे, संसाराच्या या गाड्यात, खूप दमून जाते रे, घेशील जवळ प्रेमाने, म्हणून एकटीच वाट पाहते रे, थोड काम बाजूला ठेवून, सख्या बघ तरी माझ्याकडे, तसा ही वेळ कुटे असतो, तुला पाहायला माझ्याकडे, पैशाच्या मागे नको धावू रे, दोघे प्रेमाने राहू रे, आठव ते लग्नाचे पहिले दिवस, सजणा खरच मला वेळ दे रे... सुरज माने.....कवी.

Saturday, November 27, 2021

तू माळ लेला गजरा

सखे तू माळ लेला गजरा, आज ही मला आठवतो, तो सुगंध अजून ही, माझ्या श्वासात दरवळतो, तू घातलेला गुलाबी ड्रेस, तुला खूप मस्त दिसतो, तुझा तो काढलेला फोटो, मी सारखाच पाहत असतो, तुझी ती गालावरची खळी, खरच वेड लावते मला, माझी जिंदगी आहेस ग, कसं सांगू पिलू तुला, तुझी ती बोलण्याची अदा, मला करते सखे फिदा, असेच करू निर्मळ प्रेम, कधी ही होणार नाही जुदा कवी.सुरज माने.

Wednesday, November 24, 2021

असावी निर्मळ अशी, तुझी नि माझी मैत्री, त्याला कसली बंधने नसावी, असेल माया प्रेम भाव, तरी मनीचा असावा ठाव, त्याला असावे मैत्री हे नाव, मैत्री ही अशी निभवू, जगाला ही दाखवून देऊ, अशी निर्मळ मैत्री ठेऊ. स्वप्नात तू येतेस. स्वप्नात सखे तू येतेस, किती मला छळते,स. गोड गाली हसतेस, सुंदर परी सारखी दिसतेस, बाहुत मला बिलगुन घेतेस, प्रेममय आनंद देतेस, रम्य अशा ठिकाणी नेतेस, गोड गप्पा गोष्टी करतेस, न कळत हसवून जातेस, येता गार वारा सखे, मिठीत मजला घेतेस, तुझ्या प्रेमाचा उबारा मज देतेस, अशीच केव्हा तरी माझ्या स्वप्नात येतेस < किती मला छळते,स. गोड गाली हसतेस, सुंदर परी सारखी दिसतेस, बाहुत मला बिलगुन घेतेस, प्रेममय आनंद देतेस, रम्य अशा ठिकाणी नेतेस, गोड गप्पा गोष्टी करतेस, न कळत हसवून जातेस, येता गार वारा सखे, मिठीत मजला घेतेस, तुझ्या प्रेमाचा उबारा मज देतेस, अशीच केव्हा तरी माझ्या स्वप्नात येतेस

Tuesday, November 23, 2021

मैत्री तुझी माझी ग

माझी प्रिय मैत्रीण, खूप गोड बोलते, माझ्याशी मन मोकळे करते, रोज कॉल मॅसेज करून, माझी विचारपूस करते, ध्यानाने काळजी घे म्हणते, रहावी अशीच मैत्री, स्वच्छ पाण्या सारखी, राहील सदा आहे खात्री, आहे ती चंचल हुशार, माझ्या शी गप्पा मारते खुशाल, अशीच मैत्रीची कायम राहील मशाल.

Friday, November 19, 2021

माझी ताई...उर्मिला ताई..

आहे ती माझी ताई.. स्वच्छ पाण्यासारखी निर्मळ, सर्वात जास्त आहे ती प्रेमळ, सुख दुःखात साथ देते, मन भरून माया ती करते, आनंद मनी भरते, आहे जगाहून न्यारी, माझ्यावर माया करते भारी, माझ्यावर आलेल्या दुःखास ती तारी. अशी आहे माझी रंजू ताई, आनंद मनी ठाई ठाई, आई ची ती माया देई.

Monday, November 15, 2021

प्रेमाची नशा...

अस का होतंय, अस काय आहे तुझ्यात, का होते तुला पाहता, माझ्या काळजाची दशा, अशी अफाट आहे, तुझ्या प्रेमाची नशा, रम्य ठिकाणी अशा, जोडीने जाऊ दोघे, छडेल थंडीत पुन्हा, तुझी मिठीतली प्रेमाची नशा.

Saturday, November 13, 2021

तुला सांगायचं आहे

तुला सांगायचं आहे, मनातील माझ्या सर्व, बोलून टाकायचं आहे, तुला एकांतात भेटायचं आहे, हात हाती घेऊन तुझा, तुझ्यात रमायच आहे, तुझ्याशी खूप बोलायचं आहे, बोलता बोलता तुजला, घट्ट मिठीत घ्यायचे आहे, मिठीत घेऊन तुजला, प्रेम सुख द्यायचे आहे, माझ्या स्पर्शाने तुला लाजवा याचे आहे.

Wednesday, November 10, 2021

शृंगार इतका तुझा...आनंदाचा सागर

नको करुस शृंगार इतका, तुला पाहताच वाजतो, माझ्या हृदयाचा ठोका, तुझ्या गालाची खळी, वेड लावते मला, हळूच येतो मग शहारा मला, लागेल मग गार वारा, चडेल मग दोघांचा पारा, मिलनाचा खेळ सारा, तुझे गुलाबी ओठ, मला सखे खुणावतात, न कळत मजला तुझ पाशी नेतात. आनंदाचा सागर...तुझ्या मिठीत. अशा सांजवेळी सख्या, भेटण्यास तू यावे बहुत सख्या तू मजला, घट्ट सामावून घ्यावे, पाहीन सख्या तुझी वाट, त्या निळ्या रात्रीची, आहे आतुरता मजला, सख्या तुझ्या भेटीची, त्या रात्री तू मजला, भलते इशारे करावे, आनंदाच्या या सागरा त, वाटते तुलाच बिलगून रहावे, क्षण भर का होईना सख्या, दुःख सारे विसरावे, तुझ्याच बाहुपाशात, तुझ्या स्पर्शात न्हाऊन जावे. C.r. सुरज माने.

Monday, November 8, 2021

विसरता आले नाही..

आयुष्यात खूप काही केलं, पण खोटे पना आला नाही, मैत्री केली मी जिवापाड, तुला ती समजली नाही, प्रेम खूप केलं ग मी, तुला ते करता आले नाही, थोडा चुकलो होतो मी, पण तुला सावरता आले नाही, नातं होत आपल जिवाभावाच, पण तुला ते टिकवता आले नाही, ठरवलं विसरून जाईन तुला, पण मला विसरता आलं नाही.

Friday, November 5, 2021

अशी परी आहेस तू,

अशी परी आहेस तू, बघताच क्षणी सखे, मला घायाळ करते तू, आवाज तुझा सखे, जणू कोकिळा वाटते, शब्द तुझे ऐकून मन फुलून जाते, ओठ तुझे गुलाबी, चाल तुझी शराबी, नजर हालत नाही जरा ही, अशी आहेस माझी परी, दिसतेस चंद्रा परी, आहेस माझी दुनिया खरी.

Wednesday, November 3, 2021

चेहरा तुझा निरागस

चेहरा तुझा निरागस, रूप किती ते गोंडस, गाली हास ना थोडंसं, बघताच भरते मनात, तुझाच सुंदर चेहरा, येतो सारखं ध्यानात, रोज स्वप्नात येतेस, गोड गाली हसतेस, वेड मनाला लावतेस, तुझी ती नजरेची अदा, मला करते फिदा, तुझे स्मित हास्य असावे सदा.

Tuesday, November 2, 2021

चेहरा...मुखोटा

चेहरा...खरच चेहऱ्यात काय असते का हो.. ते तुमच्या मनावर असते ,काय असते का नसते हे बघायची.कधी..कोणाचे चेहरे खूप छान असतात..पण ते खरच मनाने आतून छान असतात का.? ते ग्रेट असतात जे चेहऱ्यावर प्रेम करत नाहीत...पण चेहरा पण महत्वाचा असतो. मी एका psaykologist चा शिष्य आहे..manshastr चा अभ्यास...वगेरे..आणि लेखक असल्या मुले..सगळा अभ्यास करावा लागतो.लोक खोटी कशी असतात..कशी होतात. मन कुठे कसं आणि का विचलित होत...अस सर्व बघायचं होतं. आता माझच सांगतो...मी तोच आहे..तसाच जो दिसतो आहे..पण कधी कधी मला खोटं रूप घ्यावे लागते..ते ही खोट्या लोकांसाठीच.. आणि कोणी अशी कोणाच्या चेहऱ्याची टिंगल,चेष्टा मुळीच करू नये..आणि चेहरा किती दिवसाचा असतो हो...झालं 40 गेलं की सुरकुत्या पडतात.....म्हणून..मन चांगले ठेवा.आणि मनाने सुंदर बना..आणि ही ही गोष्ट आहे..तुमचा frd,bf,किती सुंदर handsome असतो पण तो तुमची किंमत करत नाही,दारू,वाईट गोष्टी करतो.असा असतो तो.मग फक्त तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर भाळले असता...धन्यवाद

Monday, November 1, 2021

अशा रम्य ठिकाणी

अशा रम्य ठिकाणी, जाऊ सख्या जोडीनी, फिरू दिस भर हिरवळ राणी, गावू दोघे प्रितीची गाणी. बसून गवतावर त्या, अलगद झुकेन तुझ्या मांडीवर त्या, हात फिरवे न केसात कुरुळ्या तुझ्या, तुझ्या स्पर्शाने सख्या, येईल मला शहारा, देशील ना मला तेव्हा, तुझ्या प्रेमाचा सहारा.

माझी प्रिय मैत्रीण

माझी प्रिय मैत्रीण, खूप गोड बोलते, माझ्याशी मन मोकळे करते, रोज कॉल मॅसेज करून, माझी विचारपूस करते, ध्यानाने काळजी घे म्हणते, रहावी अशीच मैत्री, स्वच्छ पाण्या सारखी, राहील सदा आहे खात्री, आहे ती चंचल हुशार, माझ्या शी गप्पा मारते खुशाल, अशीच मैत्रीची कायम राहील मशाल.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...