kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, November 10, 2021
शृंगार इतका तुझा...आनंदाचा सागर
नको करुस शृंगार इतका,
तुला पाहताच वाजतो,
माझ्या हृदयाचा ठोका,
तुझ्या गालाची खळी,
वेड लावते मला,
हळूच येतो मग शहारा मला,
लागेल मग गार वारा,
चडेल मग दोघांचा पारा,
मिलनाचा खेळ सारा,
तुझे गुलाबी ओठ,
मला सखे खुणावतात,
न कळत मजला तुझ पाशी नेतात.
आनंदाचा सागर...तुझ्या मिठीत.
अशा सांजवेळी सख्या,
भेटण्यास तू यावे
बहुत सख्या तू मजला,
घट्ट सामावून घ्यावे,
पाहीन सख्या तुझी वाट,
त्या निळ्या रात्रीची,
आहे आतुरता मजला,
सख्या तुझ्या भेटीची,
त्या रात्री तू मजला,
भलते इशारे करावे,
आनंदाच्या या सागरा त,
वाटते तुलाच बिलगून रहावे,
क्षण भर का होईना सख्या,
दुःख सारे विसरावे,
तुझ्याच बाहुपाशात,
तुझ्या स्पर्शात न्हाऊन जावे.
C.r. सुरज माने.
Monday, November 8, 2021
विसरता आले नाही..
आयुष्यात खूप काही केलं,
पण खोटे पना आला नाही,
मैत्री केली मी जिवापाड,
तुला ती समजली नाही,
प्रेम खूप केलं ग मी,
तुला ते करता आले नाही,
थोडा चुकलो होतो मी,
पण तुला सावरता आले नाही,
नातं होत आपल जिवाभावाच,
पण तुला ते टिकवता आले नाही,
ठरवलं विसरून जाईन तुला,
पण मला विसरता आलं नाही.
Friday, November 5, 2021
अशी परी आहेस तू,
अशी परी आहेस तू,
बघताच क्षणी सखे,
मला घायाळ करते तू,
आवाज तुझा सखे,
जणू कोकिळा वाटते,
शब्द तुझे ऐकून मन फुलून जाते,
ओठ तुझे गुलाबी,
चाल तुझी शराबी,
नजर हालत नाही जरा ही,
अशी आहेस माझी परी,
दिसतेस चंद्रा परी,
आहेस माझी दुनिया खरी.
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...