kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Thursday, December 2, 2021
तुझ सौंदर्य
काय सांगू सखे तुला,
मलाच कोड पडल य,
तुझ्यावर प्रेम झालं,
हे भाग्य माझ्या आयुष्यात घडल,
तुझ्या मनाच प्रतिबिंब,
माझ्या हृदयात दिसतय,
तुझ्या गुलाबी ओठांनी,
माझं काळीज भिजत य,
कोण म्हणते सौंदर्य हे,
फुला पानात असते,
त्यांना ही लाजवेल अस,
सौंदर्य मला तुझ्यात दिसते
Sunday, November 28, 2021
वेळ दे रे....( तिची व्यथा)
सख्या सजणा मला वेळ दे रे,
मनातून मला समजून घेरे,
रोज थोडा तरी मज वेळ दे रे,
त्या वेळ साठी तरस ते रे,
नको पैसे नको ती संपत्ती रे,
पैसे मी ही कमवते रे,
ऑफिस मधून मी आली की,
तुझीच वाट पाहते रे,
संसाराच्या या गाड्यात,
खूप दमून जाते रे,
घेशील जवळ प्रेमाने,
म्हणून एकटीच वाट पाहते रे,
थोड काम बाजूला ठेवून,
सख्या बघ तरी माझ्याकडे,
तसा ही वेळ कुटे असतो,
तुला पाहायला माझ्याकडे,
पैशाच्या मागे नको धावू रे,
दोघे प्रेमाने राहू रे,
आठव ते लग्नाचे पहिले दिवस,
सजणा खरच मला वेळ दे रे...
सुरज माने.....कवी.
Saturday, November 27, 2021
तू माळ लेला गजरा
सखे तू माळ लेला गजरा,
आज ही मला आठवतो,
तो सुगंध अजून ही,
माझ्या श्वासात दरवळतो,
तू घातलेला गुलाबी ड्रेस,
तुला खूप मस्त दिसतो,
तुझा तो काढलेला फोटो,
मी सारखाच पाहत असतो,
तुझी ती गालावरची खळी,
खरच वेड लावते मला,
माझी जिंदगी आहेस ग,
कसं सांगू पिलू तुला,
तुझी ती बोलण्याची अदा,
मला करते सखे फिदा,
असेच करू निर्मळ प्रेम,
कधी ही होणार नाही जुदा
कवी.सुरज माने.
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...