kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Friday, December 10, 2021
माझी सहचारिणी
मी कुट म्हणलं परी मिळावी,
जशी असावी निर्मळ असावी,
स्वार्थी ती कधी नसावी,
अशी ती सहचारिणी असावी,
थोडी भांडणारी असावी,
प्रेमाने मिठी मारणारी ही असावी,
दिसायला कशी ही असावी,
मनाने मात्र साफ असावी,
थकून आल्यावर चहा देणारी असावी,
तिरस्कार करणारी नसावी,.
मुखी तिच्या गोडी असावी,
अशी माझी सखी असावी,
ती लालची अन् खोटी नसावी,
सुख दुःखात साथ देणारी असावी,
मनात तिच्या भीती नसावी,
अशी माझी सहचारिणी असावी.
Saturday, December 4, 2021
तू माळ लेला गजरा
सखे तू माळ लेला गजरा,
आज ही मला आठवतो,
तो सुगंध अजून ही,
माझ्या श्वासात दरवळतो,
तू घातलेला गुलाबी ड्रेस,
तुला खूप मस्त दिसतो,
तुझा तो काढलेला फोटो,
मी सारखाच पाहत असतो,
तुझी ती गालावरची खळी,
खरच वेड लावते मला,
माझी जिंदगी आहेस ग,
कसं सांगू पिलू तुला,
तुझी ती बोलण्याची अदा,
मला करते सखे फिदा,
असेच करू निर्मळ प्रेम,
कधी ही होणार नाही जुदा
कवी.सुरज माने.
Thursday, December 2, 2021
तुझ सौंदर्य
काय सांगू सखे तुला,
मलाच कोड पडल य,
तुझ्यावर प्रेम झालं,
हे भाग्य माझ्या आयुष्यात घडल,
तुझ्या मनाच प्रतिबिंब,
माझ्या हृदयात दिसतय,
तुझ्या गुलाबी ओठांनी,
माझं काळीज भिजत य,
कोण म्हणते सौंदर्य हे,
फुला पानात असते,
त्यांना ही लाजवेल अस,
सौंदर्य मला तुझ्यात दिसते
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...