kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Thursday, September 30, 2021
तुझं प्रेम
प्रेम तुझ हवं आहे,
मिठीत अशी येशील का,
धुंद रात्री त्या निळ्या,
तुझ्यात सामावून घेशील का
Wednesday, September 29, 2021
पहाट
माझी सुंदर पहाट,
तुझ्या गोड शब्दांनी होते,
फुलून जातो पूर्ण दिवस,
मन आनंदी राहते,
होतो शेवटचा व्यक्त
तू ही खास होतीस,
मनाने खूप झकास होतीस,
एकतर्फी असले तरी माझे प्रेम,
तू माझी जान होतीस,
हो, होतोय शेवटचा व्यक्त,
कारण असेन उद्यापासून,
माझ्या सुखी जीवनात व्यस्त,
खूप प्रेम होतं तुझ्यावर,
भाळ लो होतो मी,
तुझ्या त्या सुंदर चेहऱ्यावर,
किती प्रयत्न केला तुला सांगण्याचा,
पण सांगू शकलो नाही,
जेव्हा सांगितले तेव्हा वेळ गेली होती,
आता त्या भावनेला काही अर्थ नाही,
तू ही नेहमी खुश रहा,
मी हो खुश असेन,
तुझे ते मॅसेज अन् फोटो,
पाहून एकटाच हसेन,
काल न्हवती तुझी आठवण आली,
नवलच झालं ना असो,
कारण मन जपणारी आयुष्यात आली,
वैतागली स त्याला कधी,
हरलीस मोडून पडलीस,
तर फक्त धीर देऊन तुला,
पण साथ देणं जमणार नाही मला,
काहीच करता येणार नाही मला,
तेव्हा मी ही बिझी असेन,
माझ्या सुखमय जीवनात,
पण तुझ फक्त नावच असेल हृदयात
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...