kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Sunday, November 28, 2021
वेळ दे रे....( तिची व्यथा)
सख्या सजणा मला वेळ दे रे,
मनातून मला समजून घेरे,
रोज थोडा तरी मज वेळ दे रे,
त्या वेळ साठी तरस ते रे,
नको पैसे नको ती संपत्ती रे,
पैसे मी ही कमवते रे,
ऑफिस मधून मी आली की,
तुझीच वाट पाहते रे,
संसाराच्या या गाड्यात,
खूप दमून जाते रे,
घेशील जवळ प्रेमाने,
म्हणून एकटीच वाट पाहते रे,
थोड काम बाजूला ठेवून,
सख्या बघ तरी माझ्याकडे,
तसा ही वेळ कुटे असतो,
तुला पाहायला माझ्याकडे,
पैशाच्या मागे नको धावू रे,
दोघे प्रेमाने राहू रे,
आठव ते लग्नाचे पहिले दिवस,
सजणा खरच मला वेळ दे रे...
सुरज माने.....कवी.
Saturday, November 27, 2021
तू माळ लेला गजरा
सखे तू माळ लेला गजरा,
आज ही मला आठवतो,
तो सुगंध अजून ही,
माझ्या श्वासात दरवळतो,
तू घातलेला गुलाबी ड्रेस,
तुला खूप मस्त दिसतो,
तुझा तो काढलेला फोटो,
मी सारखाच पाहत असतो,
तुझी ती गालावरची खळी,
खरच वेड लावते मला,
माझी जिंदगी आहेस ग,
कसं सांगू पिलू तुला,
तुझी ती बोलण्याची अदा,
मला करते सखे फिदा,
असेच करू निर्मळ प्रेम,
कधी ही होणार नाही जुदा
कवी.सुरज माने.
Wednesday, November 24, 2021
असावी निर्मळ अशी,
तुझी नि माझी मैत्री,
त्याला कसली बंधने नसावी,
असेल माया प्रेम भाव,
तरी मनीचा असावा ठाव,
त्याला असावे मैत्री हे नाव,
मैत्री ही अशी निभवू,
जगाला ही दाखवून देऊ,
अशी निर्मळ मैत्री ठेऊ.
स्वप्नात तू येतेस.
स्वप्नात सखे तू येतेस,
किती मला छळते,स.
गोड गाली हसतेस,
सुंदर परी सारखी दिसतेस,
बाहुत मला बिलगुन घेतेस,
प्रेममय आनंद देतेस,
रम्य अशा ठिकाणी नेतेस,
गोड गप्पा गोष्टी करतेस,
न कळत हसवून जातेस,
येता गार वारा सखे,
मिठीत मजला घेतेस,
तुझ्या प्रेमाचा उबारा मज देतेस,
अशीच केव्हा तरी माझ्या स्वप्नात येतेस
<
किती मला छळते,स.
गोड गाली हसतेस,
सुंदर परी सारखी दिसतेस,
बाहुत मला बिलगुन घेतेस,
प्रेममय आनंद देतेस,
रम्य अशा ठिकाणी नेतेस,
गोड गप्पा गोष्टी करतेस,
न कळत हसवून जातेस,
येता गार वारा सखे,
मिठीत मजला घेतेस,
तुझ्या प्रेमाचा उबारा मज देतेस,
अशीच केव्हा तरी माझ्या स्वप्नात येतेस
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...