Follow me

Tuesday, September 28, 2021

आपण सर्वांच्या आवडीचा ऋतू असतो.पाऊस आला कीपावसाळा सर्व फुले,झाडे, वेली,नदी नाले तलाव फुलून जातात.आणि महत्वाचं जास्त खुशी कोणाला होत असेल तर तो शेतकरी आहे.पाऊस हा शेतकऱ्याला खूप गरजेचा आहे,आणि सर्वानाच खूप गरजेचा आहे. पावसाळ्यात परवड सर्वांची होते,अन् खरी परवड गरीब सामान्यांची होते.ही परवड कोणी जवळून पहिली का हो? कोणी पहिलीच असेल तर ती त्याने अनुभवलेली असेल.पाऊस प्रमाणात असेल तर सर्वांचंच चांगल होत,पण पाऊस जर अती प्रमाणात झाला तर,ती होणारी परवड आता जीवावर ही बेतू लागली आहे.    माणसाने खूप गोष्टी तयार केल्या,सायन्स खूप पुढे आहे म्हणतात! पाऊस लागू नये म्हणून छत्री वापरली जाते.रेनकोट वापरला जातो,तशी अनेक साधने निर्माण झालीत.पण जर वर्षी होणाऱ्या अती पाऊसाने लोकांची घरे,माणसे,जनावरे त्या दरडी खाली कायमची रोऊन बसतात त्यासाठी काही ठोस तुम्ही केलय का? कशी असते हो पावसाची परवड,पडझड..कोणी अनुभवली का? त्याला विचारा पाऊसाची परवड काय असते..ज्याच्या घरात जेवण करताना पाऊसा च पाणी त्याच्या ताटात पडते.परवड काय असते विचारा त्या शेतकऱ्याला ज्याच सोन्या सारखे आलेलं पीक पाऊसात डोळ्या समोर वाहून जाते. जर  वर्षी वेगवेगळ्या बातम्या ,गोष्टी आपण पाहत असतो ऐकत असतो.मुंबई हे सोन्यासारखे शहर आहे..आणि त्याला सुंदर सोनेरी मुंबई बनवण्यात मुंबई करांचा तितकाच खूप मोठा वाटा आहे.मग का हो जर वर्षी आपली मुंबई तुंबली जाते?का त्याच मुंबई करांचा जीव त्याच पडलेल्या बिल्डिंग चे ढीगाऱ्य्या खाली जातो? का जर वर्षी सामान्य मुंबई करांच्या घरात गुढगा भर पाणी साचते..याच आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे,आणि जे प्रतिनिधी असतात त्यांना ते दाखऊन पुढचं नियोजन केलं पाहिजे.विचार करायची गोष्ट आहे तुमच्या कडे ८/९ महिने असतात...तेव्हा हे सर्व योग्य नियोजन होऊ शकते...तेव्हा जागरूक व्हा. ते चित्र डोळ्या समोर अना रात्री गाढ झोपेत असलेले माळी न गाव चे रहिवाशी...आपली ही अखेरची झोप ,अखेरची रात्र असेल असे त्यांना वाटले सुधा नसेल...काही गोष्टी अशा असतात त्या आपण टाळू शकत नाही,पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण टाळू शकतो. गरज आहे जागं होण्याची,गरज आहे योग्य नियोजनाची.पाऊस नसताना आपण कुठे हरून जातो हो? ८ महिने असतात आणि या दिवसात आपण योग्य रीतीने काळजी घेतली नियोजन केले तर अशा घटना ना आपण आळा घालू शकतो..आणि हसत खेळत जगणारे, बिझी राहत धावपळ करून जगणारे मुंबईकर..तुम्हाला जगण्यासाठी धावत असताना पाऊसाल्यात होणारी हानी,परवड,८ महिने तुम्हाला जाणवत नाही का? त्याच वेळी योग्य नियोजन करा.मी लहान पना पासून हे ऐकत आलोय,बघत आलोय,की मुंबई तुंबली.कोकण भाग पुराच्या पाण्यात तरंगतो आहे...जर वर्षी ऐकतो आहे.हे थांबणार कधी?आपण एवढ्या गोष्टी बनवतो आहे,सायन्स पुढे आहे,आणि माणूस काही करू शकतो जर त्याने विचार केला तर..मग का यावर तोडगा निघत नाही...याच उत्तर तुम्हीच शोधा आणि शोधायला भाग पाढा.  धन्यवाद.              लेखन.         सूरज माने.

No comments:

Post a Comment

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...