kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, October 6, 2021
लचके कधी थांबणार..
नमस्कार... आज जरा वेगळ्या आणि गंभीर विषयावर लेख लिहित आहे,हो विषय महत्वाचं आणि गंभीर आहे, लचके कधी थांबणार.
आपण बघतोय देशात, राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत . मुलींवर स्त्रियांवर बलात्कार होतात आणि नंतर त्यांना क्रूरतेने मारून टाकले जाते.अशा नराधम चा मी निषेध करतो.
किती लाजस्पद गोष्ट आहे,आपला देश,आपलाच राज्य आणि आपल्याच देशात राज्यात अशा घटना घडव्यात,नक्की चुकत कुठ,ती करणारी पोर पण आपलीच असतात,मुलगी ही आपल्याच पैकी असते कोणीतरी ,का अजून हि आमच्या आई बहिणी सुरक्षित नाहीत? त्या मुलांमधे ही वाईट भावना येते कुटून आणि कशी?
सगळा खेळ मानसिकतेचा आहे आणि आत्मपरीक्षण चा. लहान पनी आम्हाला शाळेत सांगितले जाते,भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत, विसरता कसे हे...
आणि इथे ही स्वार्थ आहे हा काही लोकांचा मुलांचा की माझी बहिण फक्त सेफ चांगली राहिली पाहिजे,मग बाकी काही होऊ दे..अशी मानसिकता ठेवणारे पण असतात..so का ठेवतात ते अशी मानसिकता.तुमचा मुलगा जर बिगडत चाललाय तर त्याचा नीट इलाज करा,उगाच मुली तिच्या मुलाला नीट करायच्या मशीन नाहीत.
हे अशे अपराधी कुटून तयार होतात..ते काय बाहेर देशातून येतात का? नाही ते इथलेच असतात ,कोणाचे तरी मुलगे,कोणाचे भाऊ,असे
मग का ढासळते यांची मानसिकता...
प्रत्येक पाल्याने ही काळजी कीव शिकवण दिली पाहिजे की आपला मुलगा 1 वेळेस भिक मागेल पण तसले मुलीवर अत्याचार करणार नाही कधी.
ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे.
आणि जी मुलं आज मी हा किंग ,मी अमुक राजा,अमुक भक्त,अशी नावे लावतात त्यांना समजले पाहिजे की स्वतःच्या बहिणीची जशी काळजी घेता तशी इतर ही मुलींची काळजी आणि राक्षन करा.तुम्ही कोणत्या ही मुलीच्या मागे तशा संकट काळी उभे राहिलात ना,तेव्हाच तुम्ही खरे किंग असणार आहात.
आणि मुली बिचाऱ्या काय करणार तशा वेळेस, बळ अपुरे ,टाकत अपुरी कोण मदतीला नाही.
म्हणून अशा घटना टाळण्यासाठी जनता लोक आणि चांगले न्यू जवान मुले यांची खूप गरज असते. हो जनतेचा मोठा सहभाग असावा,
कारण जनता कशी असते हे तुम्हास सांगायला नको.भितात खूप मग मी कसा जवळ जाऊ पोलिस zanjat वगेरे अस बोलून मागे सर तात
आणि आपण बघतो जर कोणाचा acsident झालं तर लोक अशी बघत बसतात mob मधे चत्रिकरण करत मग काय बोलायचं माणसांना
मुलगी जर तशा नराधमांच्या तावडीत असेल आणि तुम्हाला दिसेल तर धडाडीने जा जरी एकटे असला तरीही जा सामना करा शेवटच्या क्षणा पर्यंत...आणि त्या मुलीचं रक्षण करा,देव तुम्हाला नक्की ताकद देईल.आणि तरुण मुलांनी त्याचा
जवानी तरुण पण ताकद वाईट गोष्टी करण्यात वेस्ट घालवण्या पेक्षा आपल्या राज्यातील ,देशातील माय मुलींना अशा घटने पासून वाचवण्यात घालवा.. तरच तुमची जवानी आणि मरदांगी सफल ठरेल.हे झालं जनता आणि असणारी मुले यांनी अशा घटना घडू नये म्हणून झटणे.
आता जरा बघू मुले आणि मुली कुटे चुकतात का.
मी आधीपासूनच सांगतोय की हे प्रेम,लफड,रोमान्स,असल्या गोष्टी पासून दूरच रहा
काही मग यातूनच अशा घटना घडू शकतात.. जस तिने नकार दिला त्याचा राग असू शकतो,पुन्हा दोघांचं ही प्रेम असते पण कुटे तरी काही बिघडते मग भांडणे ,ब्रेकअप वगेरे....
म्हणून मुलींनी ही अशी चूक करता काम नये.
आता बघू आपले सरकार आणि कायदा सुव्यवस्था ,खरच ही सिस्टीम काम करते का हो नीट...हा प्रश्न मला ही पडला आहे..कीव करत ही असेल न्यायकरक काम,पण लेट होत असेल.
हा मान्य करावे लागेल की अशी घटना घडली की आरोपी ला लगेच शिक्षा देता येत नाही,तो प्रोसेस असते.कारण कोणत्याही बे गुण्याला शिक्षा होऊ नये.आणि आरोपी ना ही काही अधिकार आहेत की ते दयेचा अर्ज वगेरे करू शकतात राष्ट्र पती कडे..पण मला सांगा खरच एवढं वेळ लावण घालवन योग्य आहे का हो, त्या निर्भया cya आरोपींना 4 वर्षांनी फाशी मिळते...सांगा देशातील 1 ही नागरिकाला ते पटले नाही,फाशी झाली पण 4 वर्ष नंतर.. कोपरडी प्रकरण पण तसे झाले खूप विलंब लागला...मग चूक कोणाची सिस्टीम कायद्याची की सरकार ची ?
आणि मग हे सर्व योग्य वाटत नसेल तर मग नव्या कड्क कायद्याची गरज आहे का हा ही विचार केला पाहिजे.आणि योग्य कड्क कायदा केला ही पाहिजे. विलंब केला की काय होत त्या पीडित मुलीच्या घरच्या लोकांची स्थिती बघवत नाही हो.
आणि त्या विलंबनात जर त्या आई कीव वडिलांचं मृत्यू झाला तर...मग त्यांच्या ही आत्म्याला शांती नसणार आणि पीडित मुलीच्या ही...
आणि मुलींनी ही आता अजिबात कच्च रहायचं नाही...सोबत काही तरी बळगलेच पाहिजे हो...
तो येतोय ना तुम्हाला संपवायला इज्जत लुटायला मग कसलाही विचार करू नका सरळ चीत करून टाका...पुढचे पुढे...त्याला संपवून टाका...हो असच सांगेल . कारण जर तुम्ही त्याला रोकले नाही संपवले नाही तर तो मग असे दिल्ली,कोपर्डी सारखे अपराध करत राहील.
आणि मुलांनी ही आपली जवानी ताकद दाखवायची तीच वेळ असते कचे राहू नका
तुम्हाला जर चाहूल लागली की काही तरी तसे विपरीत होणार आहे ,की लगेच एकत्र या जीवच रान करा आन त्या ताई ला त्यांच्या तावडीतून सोडवा. आता कोणी म्हणेल की ही असली रिस्की काम पोलिस ची असतात त्यांनी केलं तर ते ठीक राहील....अहो ते नाहीत करणार वेळेवर काही,करतील पण ,पण वेळेवर नाही आणि ती निर्भया त्या अवस्थेत बस मधे आकांताने किंचाळत होती तेव्हा कुटे होते पोलिस सांगा.
कोपार्डी झालं कुटे होते....म्हणून जनतेने पुढाकार हा घेतलाच पाहिजे.तरच अशा घटना ना आळा घालता येईल...
काही चूक झाल्यास क्षमा असावी..
अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी हा छोटासा
प्रयत्न केला..जाणून घ्या,समजून घ्या.
धन्यवाद.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
खूप छान लेख
ReplyDeleteThanks..
Deleteअतिशय सुंदर,समाजातील ज्वलंत वास्तवता दर्शवणारा आणि चांगला संदेश
ReplyDeleteदेणारा लेख, खूप छान.👌👌👌👍
विचार करायला लावणारा लेख 👏👏👏👏
ReplyDeleteThanks ताई
Deleteवास्तव मांडले आपण सुंदर लेखन ✍️👌👌👌
ReplyDeleteThanks mam
Delete