kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Monday, October 18, 2021
आठवणीतील खिडकी.
मला अजून हो आठवते ती किडकी.ज्या खिडकी मधे ती येऊन बसायची.मला इशारा करायची.
हो .8 दहा वर्ष पूर्वी ची आठवण आज जागी झाली. होती अशीच एक खिडकी मला ती त्या खिडकीत दिसायची...रोज दिसायची..हसायची.
मी तर वेडा झालो होतो तिच्या प्रेमात...
आमच्या घरापासून एक शेजारचे घर होते ,तिथे उभा राहिलो की ती खिडकी दिसायची.
आणि ते घर माझ्या चुलत बहिणीचे...ती ही एकदम फ्री होती...मग मी त्या खिडकीची झलक पाहण्या साठी सारखं तिकडे असायचो.ती मुलगी ही कधी खिडकीत आली की वेगळा आवाज कडून किंवा गाणे म्हणून मला इशारा करायची
मी खूप खूष होऊन जायचो.मी सकाळ झाली की त्या जागेवर जायचो,दुपारी ही 2 वेळा चक्कर मारायची.आणि रात्री जेवण ते झोपे पर्यंत तिकडे चक्कर असायची...ओळख ही झाली होती..
आधीच फक्त हे हलके फुलके प्रेम जे म्हणतात ना फॅन्ड्री सारखं तसे होते आमचे..
ती खूप हुशार होती शाळेत...आणि आम्ही जेमतेम जरा बरे,मग यात्रेत तिचा पाठलाग करून भेटणे ,ते लाजून बोलणे...वगेरे.. पण प्रपोज करायची हिम्मत होतच न्हवती तेव्हा.खूप भीती होती.तिची ही आणि घरच्या लोकांची ही.
2 वर्ष असच फॅन्ड्री सारखं प्रेम केलं.मग माझी 12 वी झाली नॉर्मल पास...😀😂 आणि next year नंतर तिची 12 वी झाली ती 2 नंबर नी पास घरच्या लोकांनी तिला ing ला पॉलिटेक्निक ला टाकले...मी मनात ठाम केले आणि ठरवले.तिला प्रपोज करायचा.दिवस ठरला ती अशीच खिडकीत आली ,मी इशारा केला की मोगरा गुलाब झाडा जवळ ये .थोड बोलायचं आहे. ती फुले तोडीच्या बहाण्याने आली..
मी तिकडे गेलो आणि बोललो..अश्विनी मला तुला 1 सांगायचं आहे..माझे हात थर थर करत होते
छाती धड धड करत होती..भीती मनात खूप होती.शेवटी धाडसाने बोललो.. आशू..मला तुला प्रपोज करायचंय आहे..आवडतेस yr...love you....
दुसरे काय होणार माझे नशीबच...फाटके ...
ती शांत पने म्हणाली सुरज ठीक आहे आवडते मी लाईक करतोस ,प्रेम करतोस..पण मी तुला त्या ठिकाणी नाही पाहत..चांगला frd आहेस आणि राहशील..आणि आपण खूप जवळ राहतो 1 समाजात राहतो..आपले घरचे रिलेशन पण खूप मस्त आहे..so आपले प्रेम नाही सक्सेस होणार sorry..उद्या मी मोठी इंजिनीयर होईन..माझ्या घरचे माझ्या वरचड नवरा बघून लग्न करतील.
तू ही खूप शिक प्रगती कर मला विसरून जा,
पण मैत्री विसरू नको.stil frdship mi..
तिने एवढे बोलल्यावर मी जरा नाराज झालो आणि तिला stil frdship च उत्तर न देता तेथून निघून गेलो...तिथेच माझ्या पहिल्या प्रेमाचा शेवट झाला.
आज त्या गोष्टी ला 6 वर्ष झाली.ती ही चांगल्या जॉब ला आहे...आता ती गावी नसते शहरात असते..खूप प्रगती करते..
आणि मी ही खूप खुश आहे मी ही जॉब करतो,लेखन,वाचन,उद्या मोठा लेखक डायरेक्टर होईन...
जर नशिबाने साथ दिली तर माझा ऑटोग्राफ साठी उद्या ती ही लाईन मधे असेल ....
So अस होत माझं fast love...आणि ती खिडकी...आता ते घर त्यांनी मोडले आणि.
दुसरे बांधले आता ती खिडकी आणि तिची जागा नाही शी झाली....
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
छानच...👌👌👌
ReplyDeleteअप्रतीम....👌👍💐🍫
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप सुंदर लिखाण 👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर लेखन ✍️����
ReplyDelete