Follow me

Friday, October 15, 2021

अंधार व्यसनाचा..

अंधार व्यसनाचा...ही कथा एका विवाहित 35 वर्षीय तरुणाची आहे...मासाच्या आयुष्यात व्यसन हे किती घातक असते,आणि त्या मुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसन हे आयुष्याचा अंधार करून जाते.आणि हा अंधार एवढा भयानक असतो की पुन्हा उजेड होण्याची शक्यता फार कमी असते..दारू मुले जे नुकसान होत त्याचा पाचातप हा होतोच आणि भोगावाच लागतो..आणि तुमच्या वाईट कर्मा मुळे , वाईट व्यासना मुले तुमच्यावर जे भोग येतात...त्या मधे कोणीच साथ देत नाही. * अंधार...व्यसनाचा..* मीना बाहेर ओट्यावर भांडी घासत होती. दोन्ही मुले शाळेत गेली होती.मोठी मुलगी गौरी,आणि लहान मुलगा गणू. गौरी ५वी मधे तर गणू ३ री मधे होता... मीना बाहेर भांडी घासत होती,तेवढ्यात तिचा नवरा नाऱ्या खूप दारू पिऊन आला..व तो मीना ला नको त्या शिव्या देऊ लागला.. नाऱ्या= ये...मिने..ते कालच भांगलनी च पैका कुट हाय.. सांग लवकर.. मीना= अहो , तुम्ही आज पण पिऊन आला,किती यला सांगितलं...पिऊ नका,घरात लक्ष द्या लहान पोरं हायती आपली..पैका बैका काय न्हाय... ( नारू आणि मीना मधे जोरदार वाद होतो.आणि नारू मीना ला मारझोड करून पैसे घेऊन जातो. व दोन्ही मुले शाळेतून घरी येतात.) मुलगी गौरी= आय...आय..मला बाई नी नवीन धडा शिकवला...आय..तू रडती का ग? काय झालं..हाताला लागले का तूझ्या?...आय..बोल की ग..का रडती. गणू= आय...तू का रडती ग...काय झालं रडू नको...मला पण रडू येतं.. मीना= आर...पोरांनो....काय न्हाय झालं... माझं डोकं लय दुखतय...म्हण..पाणी येतंय डोळ्यातून. तुम्ही जेऊन घ्या... ( रात्री पुन्हा नाऱ्या...घरी येतो..व जेवण करून..शिवीगाळ करून झोपण्यास जातो) मीना= अहो.. काल पसन माझ्या छातीत अन् पोटात दुखतय...उद्या जाऊया सरकारी दवाखान्यात...लय तरास व्हतूया.. नाऱ्या= ये...गप पड.पोटात दुखतय..न्हाई लगीच मरत... ( त्या रात्री मीनाला खूप त्रास झाला, पण तिने तो अंगावर काढला..उद्या दवाखान्यात जायचं या आशेवर.) ( दुसऱ्या दिवशी मुले शाळेत जातात.अन् मीना नाऱ्या ला चला दवाखान्यात जायचं असे सांगते) मीना= अहो..चला की लय तरास होतय.. नाऱ्या= ये...दवाखाना नंतर...मला 100 रू दे आदी...दे लवकर न्हाय तर कानसुल फुडीन. मीना= आव अस का करतात ...मी ते पैस पोरांच्या शाळ साठी अन् मला दवाखाना साठी ठेवल्यात...म्या न्हाई देणार.. ( नाऱ्या पुन्हा जाऊ दवाखान्यात पण मला आता पैसे दे अस सांगत मीना ला शिवीगाळ करतो.आणि पैसे घेऊन बाहेर जातो.) ( मीना चा जीव मुलांसाठी खूप तुटत असतो.नशिबी नवरा असला,मला ही बिमारी,मुलांचं कसं होणार..या चिंतेत ती असायची) ( रात्री नाऱ्या पुन्हा पिऊन घरी येतो.) मीना= आव..काय म्हणायचं तुम्हाला..सगळ्या पशाची दारू पिऊन आला..मला लय तरास होतय...मला काय बी करून उद्या दवाखान्यात न्या... नाऱ्या= य बाई...झोप तू उद्या बघायला इल...मरत न्हैस लगिच..पैस संपल्याती...म्या समद उडवल...झोप गप. ( दोघा मधे पुन्हा वाद मारझोड होते.मुल घाबरतात) गौरी मुलगी= बाबा आय ला का मारताय...मारू नका...( रडू लागते) गणू= बाबा मारू नका आई ला...( जोराने रडत आई पाशी जाऊन तिच्या मांडीवर झोपतो) ( मीना ही सर्व यातना,लागलेला मार सहन करून झोपी जाते.) दुसऱ्या( दिवशी सकाळी) दोन्ही( मुले शाळेत जातात..आणि नारू आता नीट शुध्दीवर असतो..तो गावातील लोकांकडे पैसे मागायला जातो..तसा तो जे काम करेल तो पैसा तो दारू जुगार मधे उडवायचा..आणि आता तो लोकांकडे उदार पैसे मागण्यासाठी जातो..) हिकडं( घरात मीना वेदनेने व्याकूळ..आपल्या मुलांची अन् नवऱ्याची वाट बघत बसते.) ( मुले शाळेतून घरी येताना त्यांचा संवाद) गणू= ये...दिदे...बाबा आई ला रोज का मरतो ग.. आई लय रडती...मला बी लय रडायला येत मग... ( गणू रडू लागतो) गौरी= गणू रडू नको,न्हाई मारत बाबा...ही समद दारू मूळ होतय...तू रडू नको...चल लवकर घरी...आपल्याला..आई ला दवाखान्यात न्याच हाय...बाबा न्हेत नाय ना आई ला दवाखान्यात चल आपण न्हेऊ तिला. ( दोन्ही मुले घरा पाशी पोचतात..घराचा दरवाजा अलगद उघडतात...) ( सगळ दृश्य पाहून गौरी जोराने किंचालते, हंबरडा फोडते..) ( ते दृश्य होत...मीना चीली पाशी...नीचीप पडलेली असते...अगदी कायमची...( Deth) ( काही वेळाने नारू हताश चेऱ्याने घरी येतो..त्याला पैसे कोणीच दिले न्हवते...त्याला ही काही सुचत नव्हते आणि तो घरी येतो...आणि त्याला...एक दृश्य दिसते...) ( मीना शांत चुली पाशी पडलेली...आणि ती दोन्ही मुलं...आकांताने...किंचाळत..हंबरडा फोडत...आई पाशी...बसलेली असतात.) नाऱ्या ला आता कळून चुकले आपण खूप मोठी चूक केली...आपल्या व्यासणा मुळ आपल्या जीवनाचा ,आपल्या संसाराचा अंधार झाला. तो ही डोके आपटून रडू लागतो...त्याला पाचातप होतो... . समाप्त. धन्यवाद.. टिपः... सदर कथा काल्पनिक असून असणाऱ्या पात्रा शी,घटने शी,नावाशी,कोणाचा काही संबंध नाही...असल्यास योगायोग समजावा..

4 comments:

  1. खुप सुंदर, प्रेरणादायक कथा....👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. व्वा खुप खुप सुंदर कथा लेखन ✍️👌

    ReplyDelete
  3. अतिशय हृदयस्पर्शी कथा लेखन, वास्तववादी👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लिखाण....👍👌✍️🍫

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...