kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, December 22, 2021
नमस्कार..नमस्कार...frd..आज मी एका सामाजिक विषयावर..एका ज्वलंत विषयावर लेख लिहित आहे. माणसाचे जगणे हे परिस्थिती नुसार चालत असते.मग जशी परिस्थिती तसे माणसाचे राहणे.
आणि आज काल तर पैसा हाच माणसाचा मेन पॉइंट झाला आहे.सकाळी उठल्या पासून ते रात्री पर्यंत माणूस पैशाच्या मागे धावत असतो.
हा काम कले पाहिजे उदरनिर्वाह साठी काम करून पैसे कमवले पाहिजेत.पण ते सर्व योग्य रीतीने व्हायला पाहिजे असे मला वाटते.
जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,माणसाला जगताना पैसाच सर्वस्व नाही.बाकीच्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत.
जसे माणसे,नाती,व्यवहार,वागणे, बोलणे,ओळख...मन जपणे इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.आपण जरा मागे गेलो म्हणजे,
पूर्वी जीवन कसे होते,पूर्वी पैशाला जास्त किंमत न्हवती.माणसाने एक दिवस काम केले तर त्याला चहा पणी करून जेवण देऊन पाठवत असे .
आत्ता ते परवडणारे नाही हे मान्य आहे.पण हेतू आणि तत्व समजून घ्या.पूर्वी विहीर बांधायची झाली तर ते लोक 4 दिवस मालका घरी राहत असे.मग काम झाल्यावर त्यांना, जवारी, गहू तांदूळ , गूळ अशा वस्तू देत असत.आणि माया चांगला व्यवहार..जसे की घरचे लोक आहेत.
एक गोष्ट लक्षात घ्यावी की पाहिले पैशाला जास्त किंमत न्हवती,पण किंमत होती माणसाला त्याच्या गुणाला,माया होती जिव्हाळा होता..
माणसे एकमेकांना जपायची समजून घ्यायची.
सर्व सुरुळीत चालत होते. वानी,लोहार, कुंभार, जे ते आपला व्यवसाय करून जगत होते.
सर्वात महत्वाची गोष्ट तेव्हा पाप कमी व्हायची.
आता अस होताना दिसत नाही,आता प्रमाणाच्या बाहेर पाप वाढायला लागली.मग मग काय,
सृष्टी चा नियम आहे जसा संकल्प असेल तशी सृष्टी, म्हणजे जसा माणसाचा संकल्प असेल तशीच सृष्टी होणार आणि त्याचा परिणाम आपण पाहत आहोत.माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी सुखासाठी जगता जगता तो दुसऱ्याचा स्वार्थ आणि दुसऱ्याच सुख विसरून गेला आहे.हे वास्तव आहे.धरती वर किती आणि कसे पाप घडते हे आता तुम्हास नव्याने सांगायला नको.
मधल्या काळात कोरोणा नावाची बिमारी रोग आला.पूर्ण जगाला हैराण करून सोडले.
मानव जीव खूप घाबरून गेला.शेवट तर जनजीवन बंद करावे लागले. म्हणजे लॉक.
का तर जीव जातो,माणूस मरतो...म्हणून.
पूर्ण देश बंद केला पण,पोट बंद करू शकत नाही.
मग ज्याच्या कडे आहे ते खुशाल जगत होते घरी बसून..पण ज्यांच पोट हतावरती होत ते कसे जगणार..त्यांना तर खूपच त्रास सहन करावा लागला.फुकट राशन दिले ठीक आहे.
गहू आणि तांदूळ.... डाळ..बस झाल.
काही लोकांनी माणुसकी दाखवली, दया दाखवली,गरिबांना खायला वाटले,जेवण दिले.हे सर्व ठीक .पण घराचा हप्ता,घर भाडे,बँक हप्ता सामान्य माणसे लॉक डाऊन मधे कशी भरणार होती हो.काहींनी महिना भर माप ही केले असेल.पण दुसऱ्या महिन्यात दारावर हजर होते.
काहींनी पेशंट chya नावाखाली खिसे भरले.
काहींनी पेशंट चे सोने,पैसे लंपास केले.
कुटे गेली हो माणुसकी आणि माया जिव्हाळा.
किती हे आक्रित कुटे फेडणार हे सांगा.
निसर्ग आपल्याला हवी तेवढी हवा देतो,स्वच्छ आणि निर्मळ.पण आज आम्ही त्याच हवेला मोकार झालो.ऑक्सिजन शिवाय किती लोकांचे प्राण गेले.
सर्व पूर्णत्वास आल्या अंतर असे वाटले की आता तरी लोक सुधारतील नीट राहतील ,माणुसकी धरून राहतील.पण तसे दिसून येत नाही.
इथून इथे जायचे आता 40 रू घेतात.
लाँग rut ला डबल भाडे घेतात. जिथे समजून घ्यायचे आहे तिथे समजून घेताना दिसत नाहीत.
गरीब श्रीमंत हा भेदभाव कोरॉना ने पुसून टाकला होता.पण पुन्हा तीच गत दिसून येत आहे.
माणूसच माणसाचा घात करत आहे,
माणूसच माणसाचा त्रास ही बनतोय आणि दवा ही.जो पर्यंत धरती वर पाप संपत नाही ,तो पर्यंत सृष्टी वर ही पाप होत राहणार.त्याचे परिणाम आपण पाहत आहोत.पाऊस,भूकंप,अतिरेक,रोग.
म्हणून हे कुटे तरी थांबावे,माणसाने काही झाले तरी माणुसकी सोडू नये.
एक गोष्ट कायम लक्षात असावी की तुमची जायची वेळ झाली ना..मग तुमच्याकडे किती कोटी रुपये असो तुम्ही जीव वाचवू शकत नाही.
C.R.
सुरज माने.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
अतिशय वास्तववादी लेख लिहिला आहेस,खूप छान लिखाण.👌👌👌👍
ReplyDeleteखूपच छान लेख 👌👍👍
ReplyDeleteसुंदर लिहिलंय!✍️👌👌👌
ReplyDelete