kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, October 13, 2021
भेटणे शक्य नाही..
जीव आहे तुझ्यावर,
पण भेटणे शक्य नाही,
होते मनाची लाही लाही,
वाटत तुला द्यावा आनंद,
त्या कल्पनेच्या दुनियेत,
रमून जावे वाटते तुझ्या छायेत,
जरी लांब असलो तरी,
कायम राहील हृदयात,
तुझी आठवण राहील मनात,
तुझ्या मॅसेज चा बोलण्याचा,
सहवास भारी वाटतो,
मनाला आनंद देतो.
तू आहेस निर्मळ
तू आहेस निर्मळ,
तू आहेस कोमल,
तू आहेस चंचल,
तू आहेस निरागस,
तुला पाहताना होते,
माझ्या मनाची कस,
तुझे ते रेशमी केस,
आणि तुझा तो,
वेड लावणारा फेस,
तुझे ते गोरे गाल,
तुझे ते ओठ लाल,
मनाला फुंकर घाल.
Tuesday, October 12, 2021
साथ देशील का..
जीव लावते तुझ्यावर सख्या,
साथ मला देशील का,
आपली म्हणून मला,.
घट्ट मिठीत घेशील का,
पडले मी एकटी जरी,
हात माझा धरशील का,
जगाने सोडली साथ जरी,
तू मज साथ देशील का,
एकटी पडले रे आयुष्यात,
एकटे पण दूर करशील का,
या जीवनी सख्या,
मला तू साथ देशील का,
धुंद अशा राती ला,
स्वप्नात सख्या येशील का,
तुझ्या मायेच्या त्या,
घट्ट मिठीत घेशील का,
सोडूनी सर्व येईन तुझ्याकडे,
मला सख्या सावर शील का,
त्या प्रेम सुखाच्या दुनियेत,
माझ्या सवे रमून जाशील का.
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...