kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Monday, November 1, 2021
माझी प्रिय मैत्रीण
माझी प्रिय मैत्रीण,
खूप गोड बोलते,
माझ्याशी मन मोकळे करते,
रोज कॉल मॅसेज करून,
माझी विचारपूस करते,
ध्यानाने काळजी घे म्हणते,
रहावी अशीच मैत्री,
स्वच्छ पाण्या सारखी,
राहील सदा आहे खात्री,
आहे ती चंचल हुशार,
माझ्या शी गप्पा मारते खुशाल,
अशीच मैत्रीची कायम राहील मशाल.
Sunday, October 31, 2021
खोटी मैत्रीण
होतीस मैत्रीण जिवाभावाची,
पण तुला किंमत नाही माझी,
नुसते खोटं साँग करते,
झाली जीवाची लाही
Thursday, October 28, 2021
अशी एखादी मैत्रीण असावी,
अशी एखादी मैत्रीण असावी,
ती कायम सोबत रहावी,
मैत्री ही निर्मळ असावी,
कधी नाराज असलो तरी,
धीर देणारी असावी,
ती मनाने निर्मळ असावी,
कधी मागे पडलो तरी,
सोबत घेवून पुढे नेणारी असावी,
एकटे वाटेत सोडणारी नसावी,
अस हक्काने सांगणारी असावी,
मी आहे काळजी करू नको कशाची,
तुला साथ देईन कायमची,
ती हळूच गाली हसणारी असावी,
गोड मधुर बोलणारी असावी,
ती खांद्यावर हात ठेवणारी असावी.
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...