Follow me

Friday, November 19, 2021

माझी ताई...उर्मिला ताई..

आहे ती माझी ताई.. स्वच्छ पाण्यासारखी निर्मळ, सर्वात जास्त आहे ती प्रेमळ, सुख दुःखात साथ देते, मन भरून माया ती करते, आनंद मनी भरते, आहे जगाहून न्यारी, माझ्यावर माया करते भारी, माझ्यावर आलेल्या दुःखास ती तारी. अशी आहे माझी रंजू ताई, आनंद मनी ठाई ठाई, आई ची ती माया देई.

Monday, November 15, 2021

प्रेमाची नशा...

अस का होतंय, अस काय आहे तुझ्यात, का होते तुला पाहता, माझ्या काळजाची दशा, अशी अफाट आहे, तुझ्या प्रेमाची नशा, रम्य ठिकाणी अशा, जोडीने जाऊ दोघे, छडेल थंडीत पुन्हा, तुझी मिठीतली प्रेमाची नशा.

Saturday, November 13, 2021

तुला सांगायचं आहे

तुला सांगायचं आहे, मनातील माझ्या सर्व, बोलून टाकायचं आहे, तुला एकांतात भेटायचं आहे, हात हाती घेऊन तुझा, तुझ्यात रमायच आहे, तुझ्याशी खूप बोलायचं आहे, बोलता बोलता तुजला, घट्ट मिठीत घ्यायचे आहे, मिठीत घेऊन तुजला, प्रेम सुख द्यायचे आहे, माझ्या स्पर्शाने तुला लाजवा याचे आहे.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...