Follow me

Tuesday, October 12, 2021

साथ देशील का..

जीव लावते तुझ्यावर सख्या, साथ मला देशील का, आपली म्हणून मला,. घट्ट मिठीत घेशील का, पडले मी एकटी जरी, हात माझा धरशील का, जगाने सोडली साथ जरी, तू मज साथ देशील का, एकटी पडले रे आयुष्यात, एकटे पण दूर करशील का, या जीवनी सख्या, मला तू साथ देशील का, धुंद अशा राती ला, स्वप्नात सख्या येशील का, तुझ्या मायेच्या त्या, घट्ट मिठीत घेशील का, सोडूनी सर्व येईन तुझ्याकडे, मला सख्या सावर शील का, त्या प्रेम सुखाच्या दुनियेत, माझ्या सवे रमून जाशील का.

3 comments:

  1. खुप सुंदर रचना , सुरेख शब्दांकन...��������

    ReplyDelete
  2. सुंदरच 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना ������

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...