Follow me

Wednesday, April 6, 2022

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर येईल. एका गरीब सामान्य कुटुंबातील ही कथा आहे. समाजातील व्यथा,जाणीव,परिस्थिती...या सगळ्या गोष्टी चां मेळ या मधे आपणास पाहायला मिळेल. चला तर मग कथा सुरू करू. कथेचं नाव आहे.." व्यथा मायलेकीची " एका खेडे गावात दामू आणि त्याचा परिवार राहत होता. दामू मोल मजुरी करून घर चालवत असे. त्याची पत्नी तारा बाई..ती ही शेतातील खुरपणी करत असे.त्यांना दोन मुलीच होत्या. मोठी निता,आणि तिच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान सुरेखा. नीता 7 वी मध्ये शिकत होती,सुरेखा पाचवी मध्ये. दामू ला दारू चे व्यसन होते. पण तरी ही दामू कसा बसा घर चालवत होता. तारा बाई ही रानात शेतात मजुरी साठी जात असे. एके दिवशी दामू दारू पिऊन घरी आला,आणि तारा शी भांडू लागला,त्या वेळी शाळेतून दोन्ही मुली रडत घरी आल्या... मुली रडत= आई बाबा आम्हाला शाळेतून घरी धाडले...परीक्षेचे पैसे भरले नाहीत म्हणून...दोन्ही मुली रडू लागल्या. तारा ने त्यानं पदरात बांधलेले फुटाणे दिले आणि त्यांना शांत केले, तारा.= पोरीनो रडू नका, म्या भरिन तुमची साळ ची फी....नका रडू अभ्यास करा..उद्या भरीन म्या . तारा दामू ला बोलू लागली भांडू लागली, तारा = काय व...माझ्या संसराच वाटोळे केले दारू पिऊन,आता पोरांच्या आयुष्याचं वाटोळं नका करू ,कमाल जा दारू ढोसू नका. दामू = अग तारा मला बी कळतंय ग,पण माझी दारू काय सुटणा...मी काय करू ग...माझ्या मूळ तुमच्या सर्वांचा वनवास झाला. आता न्हाय हु देणार...मी रोज कामाला जाईन, तारे आपल्या पोरींना लय शिकवायच....मोठ करायचे.. माझं सपान हाय बग. तारा = व्हय व्हय ...उद्या जा कामा ला....भाकरी दिती करून. सगळे बरे चालले होते,म्हणतात ना चांगल्या घराला आणि संसाराला कोणाची नजर न लागो. काही वर्षे लोटली ,मुली आता मोठ्या कळत्या झाल्या... मुली सकाळी शाळेत जायला निघाल्या. पायात चप्पल न्हवती...उन्हाचा कडाका होता. सुरेखाचे पाय पोळू लागले.सुरेखा ला रडू कोसळले. नीता ने तिला धीर दिला... आणि निता ची नजर रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कापडी पिशवी वर पडली...व ती पिशवी तिने फाडली आणि दोघींच्या पायाला गुंडाळली... नीता = सुरे आता रडु नको आई ला सांगते तुला चप्पल घ्यायला तो पर्यंत आपली चप्पल हीच ग. कापडाची चिंधी बांधून दोघी शाळेत गेल्या.दोघी ही खूप हुशार होत्या. शाळेतील अनेक मुली मुले त्यांना हसत असत...चेष्टा करत असत. दामू कामाला जात असताना त्याला मागून गाडीची जोरदार धडक बसते...दामू खाली रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो, काही लोक त्याला हॉस्पिटल मधे घेऊन जातात हिकडं तारा शेतात काम करत होती. एका गावातल्या माणसाने तिला ती बातमी दिली, तिच्या पाया खालची जमीन सरकली. मुली शाळेत शिकत होत्या ,त्यांना ही बातमी दिली. मुली व तारा हॉस्पिटल मधे येतात. डोक्याला जबर मार लागल्यामुळे दामू ची तब्बेत खूपच नाजूक होती. डॉक्टर नी देवाकडे बोट दाखवले. तारा आणि मुली आकांताने रडू लागल्या. ( दामू ची तब्बेत खूपच नाजूक होती दोन ते तीन दिवस दामू ने काढले, आणि चौथ्या दिवशी दुःखाचा डोंगर फुटला दामू हे जग सोडून गेला) (काय सांगावी ती मयालेकिंची अवस्था... तारा च्या पाया खालची जमीन सरकली..मुली आकांताने ओरडू रडू लागल्या...दामू गेल्याच दुःख खूप मोठं होत,) दामू घराचा आधार होता. आणि आता तो आधार गेला होता. तारा ला आता खूप एकटे वाटू लागले.घर,मुलींचं शिक्षण आता कसे करायचे हा प्रश्न तिला पडू लागला. काही वर्षे अशीच दुःखात लोटली, पण तारा ने तिची मुलींना शिक्षण द्यायची जिद्द सोडली नाही. मुली ही आता खूप मोठ्या झाल्या, तारा ही आता उतरत्या वयात आली होती. दामू गेल्या नंतर तिघी मयालेकिनी खूप हलाखीत दिवस काढले होते. आता मुलींचं कॉलेज पूर्ण झाले होते.... नीता ची पोलिस भरती जवळ आली होती, आणि सुरेखा चा एलएलबी चा रिझल्ट होता. नीता = आई ...उद्या माझी भरती पुणे होईल मला सिलेक्ट करतील मला आई शहरात गेले पाहिजे. अन् सुरी ला पण जायचं आहे...तिचा निकाल आहे ती वकील होईल ग आई. तारा = अग पोरींनो जा लवकर उद्या...माझा आशीर्वाद आहे, बाबांचा पण आशीर्वाद हाय तुम्हांला...लय मोठ व्हा....( ताराच्या डोळ्यातून पाणी येते) वडीलांच्या माघारी तारा ने मुलींना खूप कष्ट करून शिकवले होते,खूप काबाड कष्ट घेतले होते. वयानुसार तारा ची तब्बेत ही नाजूक होत होती. तिने तिच्या शरीराला झालेल्या जखमा मुलींना दाखवल्या न्हवत्या. त्या रात्री तारा ला खूप ताप आला होता, तारा तापाने आणि वेदनेने व्याकूळ होती. तिला दम्याचा त्रास ही होत होता. पण तारा ने मुलींना जरा ही भनक लागू दिली नाही. मुलींना सांगावे तर मुली शहरात जाणार नाहीत. माझीच काळजी करत बसतील. तारा तशीच झोपून राहिली. दिवस उजाडला दोन्ही मुली तयार झाल्या. आई ने पदरात बांधून ठेवलेले पैसे मुलींना दिले. सगळी तयारी झाली मुली bag घेऊन निघाल्या. नीता = आई जाते ग....( रडत) आई आम्ही आठ ते दहा दिवसांनी येईन...तू वेळेवर जेव काळजी घे...आई तू खूप केलंस ग आमच्या साठी. सुरेखा = आई जाते ग...( रडत मिठी मारली) आई काळजी घे....आम्ही लगेच येऊ...आणि आता आपले सगळे कष्ट संपणार आहेत.तू शेतात अजिबात जायचं नाही...तुझी लेक वकील होणार आहे. ( तारा दोघी लेकिंना घट्ट मिठी मारते.व तिघी ही रडू लागतात,बस येते मुली गाडीत बसतात.आणि आई चा निरोप घेतात) चार दिवस झाले मुली जाऊन तारा ला दम्याचा त्रास होऊ लागला, तारा वेदनेने विव्हळत होती,व्याकूळ होती. तरी ती तिच्या मुलींसाठी दिवस ढकलत होती. मुलींना खूप मोठं झालेलं पहायचं होतं तिला. गावातले शेजारी लोक तारा ला बोलू लागले की तारा तुझी तब्बेत खूपच खराब आहे.लवकर दवाखान्यात जायला हवे.मुलींना फोन करूया का तुझ्या. त्या गोष्टीस तारा ने साफ नकार दिला. अजिबात नाही...कोणी ही माझ्या लेकींना फोन करायचा नाही.त्यांना काही ही सांगायचे नाही.माझी आन आहे तुम्हास. त्यांना काही सांगू नका नाही तर त्या आहे तशा सर्व टाकून येतील..त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं मला पहायचं आहे. असे तारा लोकांना म्हणाली, आज खूप आनंदाचा दिवस... निता पोलिस भरती मधे पात्र ठरली, निता खूप खुश होती, इकडे सुरेखा ही llb मधे वकीलीस पात्र ठरली. दोघी मुली ही खूप खुश आनंदी होत्या. ही बातमी आई ला कधी जाऊन सांगते असे नीता ला वाटू लागले. दोघी ही गावाला जायला निघाल्या. आई साठी नवीन साडी घेतली,व दोघी आनंदात गावी जाण्यासाठी निघाल्या. मुली गावात पोचल्या....गावातून घरासमोर आल्या...बघतात तर काय? घरा बाहेर मोठी गर्दी झालेली. सगळे लोक जमा झालेले. मुली धावत घराकडे गेल्या.... बघतात तर काय तारा निपचित पडलेली...अगदी कायमची.. ( तारा हे जग सोडून गेली होती) दोन्ही मुलींनी आई ला पाहताच हंबरडा फोडला.. मुली जोरजोरात रडू लागल्या... आई....उठ ना...आई....आई बग तुझ्या लेकी आल्यात...आई आम्ही खूप मोठ्या झालो ग.. आई आमचं कौतुक कर ना,आई उठ ना.. मुली जोरात रडू लागल्या. मुलींना खूप दुःख झाले. लोकांनी मुलींना सावरले...आणि तारा ची अंत यात्रा निघाली... आयुष्यभर तिची , कष्टाने काया झिजली, मुलांच्या सुखासाठी ती, आज कायमची निजली. समाप्त. कथा लेखन. (कवी लेखक) सुरज प्रल्हाद माने.

Wednesday, December 22, 2021

नमस्कार..नमस्कार...frd..आज मी एका सामाजिक विषयावर..एका ज्वलंत विषयावर लेख लिहित आहे. माणसाचे जगणे हे परिस्थिती नुसार चालत असते.मग जशी परिस्थिती तसे माणसाचे राहणे. आणि आज काल तर पैसा हाच माणसाचा मेन पॉइंट झाला आहे.सकाळी उठल्या पासून ते रात्री पर्यंत माणूस पैशाच्या मागे धावत असतो. हा काम कले पाहिजे उदरनिर्वाह साठी काम करून पैसे कमवले पाहिजेत.पण ते सर्व योग्य रीतीने व्हायला पाहिजे असे मला वाटते. जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,माणसाला जगताना पैसाच सर्वस्व नाही.बाकीच्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. जसे माणसे,नाती,व्यवहार,वागणे, बोलणे,ओळख...मन जपणे इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.आपण जरा मागे गेलो म्हणजे, पूर्वी जीवन कसे होते,पूर्वी पैशाला जास्त किंमत न्हवती.माणसाने एक दिवस काम केले तर त्याला चहा पणी करून जेवण देऊन पाठवत असे . आत्ता ते परवडणारे नाही हे मान्य आहे.पण हेतू आणि तत्व समजून घ्या.पूर्वी विहीर बांधायची झाली तर ते लोक 4 दिवस मालका घरी राहत असे.मग काम झाल्यावर त्यांना, जवारी, गहू तांदूळ , गूळ अशा वस्तू देत असत.आणि माया चांगला व्यवहार..जसे की घरचे लोक आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यावी की पाहिले पैशाला जास्त किंमत न्हवती,पण किंमत होती माणसाला त्याच्या गुणाला,माया होती जिव्हाळा होता.. माणसे एकमेकांना जपायची समजून घ्यायची. सर्व सुरुळीत चालत होते. वानी,लोहार, कुंभार, जे ते आपला व्यवसाय करून जगत होते. सर्वात महत्वाची गोष्ट तेव्हा पाप कमी व्हायची. आता अस होताना दिसत नाही,आता प्रमाणाच्या बाहेर पाप वाढायला लागली.मग मग काय, सृष्टी चा नियम आहे जसा संकल्प असेल तशी सृष्टी, म्हणजे जसा माणसाचा संकल्प असेल तशीच सृष्टी होणार आणि त्याचा परिणाम आपण पाहत आहोत.माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी सुखासाठी जगता जगता तो दुसऱ्याचा स्वार्थ आणि दुसऱ्याच सुख विसरून गेला आहे.हे वास्तव आहे.धरती वर किती आणि कसे पाप घडते हे आता तुम्हास नव्याने सांगायला नको. मधल्या काळात कोरोणा नावाची बिमारी रोग आला.पूर्ण जगाला हैराण करून सोडले. मानव जीव खूप घाबरून गेला.शेवट तर जनजीवन बंद करावे लागले. म्हणजे लॉक. का तर जीव जातो,माणूस मरतो...म्हणून. पूर्ण देश बंद केला पण,पोट बंद करू शकत नाही. मग ज्याच्या कडे आहे ते खुशाल जगत होते घरी बसून..पण ज्यांच पोट हतावरती होत ते कसे जगणार..त्यांना तर खूपच त्रास सहन करावा लागला.फुकट राशन दिले ठीक आहे. गहू आणि तांदूळ.... डाळ..बस झाल. काही लोकांनी माणुसकी दाखवली, दया दाखवली,गरिबांना खायला वाटले,जेवण दिले.हे सर्व ठीक .पण घराचा हप्ता,घर भाडे,बँक हप्ता सामान्य माणसे लॉक डाऊन मधे कशी भरणार होती हो.काहींनी महिना भर माप ही केले असेल.पण दुसऱ्या महिन्यात दारावर हजर होते. काहींनी पेशंट chya नावाखाली खिसे भरले. काहींनी पेशंट चे सोने,पैसे लंपास केले. कुटे गेली हो माणुसकी आणि माया जिव्हाळा. किती हे आक्रित कुटे फेडणार हे सांगा. निसर्ग आपल्याला हवी तेवढी हवा देतो,स्वच्छ आणि निर्मळ.पण आज आम्ही त्याच हवेला मोकार झालो.ऑक्सिजन शिवाय किती लोकांचे प्राण गेले. सर्व पूर्णत्वास आल्या अंतर असे वाटले की आता तरी लोक सुधारतील नीट राहतील ,माणुसकी धरून राहतील.पण तसे दिसून येत नाही. इथून इथे जायचे आता 40 रू घेतात. लाँग rut ला डबल भाडे घेतात. जिथे समजून घ्यायचे आहे तिथे समजून घेताना दिसत नाहीत. गरीब श्रीमंत हा भेदभाव कोरॉना ने पुसून टाकला होता.पण पुन्हा तीच गत दिसून येत आहे. माणूसच माणसाचा घात करत आहे, माणूसच माणसाचा त्रास ही बनतोय आणि दवा ही.जो पर्यंत धरती वर पाप संपत नाही ,तो पर्यंत सृष्टी वर ही पाप होत राहणार.त्याचे परिणाम आपण पाहत आहोत.पाऊस,भूकंप,अतिरेक,रोग. म्हणून हे कुटे तरी थांबावे,माणसाने काही झाले तरी माणुसकी सोडू नये. एक गोष्ट कायम लक्षात असावी की तुमची जायची वेळ झाली ना..मग तुमच्याकडे किती कोटी रुपये असो तुम्ही जीव वाचवू शकत नाही. C.R. सुरज माने.

Friday, December 10, 2021

माझी सहचारिणी

मी कुट म्हणलं परी मिळावी, जशी असावी निर्मळ असावी, स्वार्थी ती कधी नसावी, अशी ती सहचारिणी असावी, थोडी भांडणारी असावी, प्रेमाने मिठी मारणारी ही असावी, दिसायला कशी ही असावी, मनाने मात्र साफ असावी, थकून आल्यावर चहा देणारी असावी, तिरस्कार करणारी नसावी,. मुखी तिच्या गोडी असावी, अशी माझी सखी असावी, ती लालची अन् खोटी नसावी, सुख दुःखात साथ देणारी असावी, मनात तिच्या भीती नसावी, अशी माझी सहचारिणी असावी.

Saturday, December 4, 2021

तू माळ लेला गजरा

सखे तू माळ लेला गजरा, आज ही मला आठवतो, तो सुगंध अजून ही, माझ्या श्वासात दरवळतो, तू घातलेला गुलाबी ड्रेस, तुला खूप मस्त दिसतो, तुझा तो काढलेला फोटो, मी सारखाच पाहत असतो, तुझी ती गालावरची खळी, खरच वेड लावते मला, माझी जिंदगी आहेस ग, कसं सांगू पिलू तुला, तुझी ती बोलण्याची अदा, मला करते सखे फिदा, असेच करू निर्मळ प्रेम, कधी ही होणार नाही जुदा कवी.सुरज माने.

Thursday, December 2, 2021

तुझ सौंदर्य

काय सांगू सखे तुला, मलाच कोड पडल य, तुझ्यावर प्रेम झालं, हे भाग्य माझ्या आयुष्यात घडल, तुझ्या मनाच प्रतिबिंब, माझ्या हृदयात दिसतय, तुझ्या गुलाबी ओठांनी, माझं काळीज भिजत य, कोण म्हणते सौंदर्य हे, फुला पानात असते, त्यांना ही लाजवेल अस, सौंदर्य मला तुझ्यात दिसते

Sunday, November 28, 2021

वेळ दे रे....( तिची व्यथा)

सख्या सजणा मला वेळ दे रे, मनातून मला समजून घेरे, रोज थोडा तरी मज वेळ दे रे, त्या वेळ साठी तरस ते रे, नको पैसे नको ती संपत्ती रे, पैसे मी ही कमवते रे, ऑफिस मधून मी आली की, तुझीच वाट पाहते रे, संसाराच्या या गाड्यात, खूप दमून जाते रे, घेशील जवळ प्रेमाने, म्हणून एकटीच वाट पाहते रे, थोड काम बाजूला ठेवून, सख्या बघ तरी माझ्याकडे, तसा ही वेळ कुटे असतो, तुला पाहायला माझ्याकडे, पैशाच्या मागे नको धावू रे, दोघे प्रेमाने राहू रे, आठव ते लग्नाचे पहिले दिवस, सजणा खरच मला वेळ दे रे... सुरज माने.....कवी.

Saturday, November 27, 2021

तू माळ लेला गजरा

सखे तू माळ लेला गजरा, आज ही मला आठवतो, तो सुगंध अजून ही, माझ्या श्वासात दरवळतो, तू घातलेला गुलाबी ड्रेस, तुला खूप मस्त दिसतो, तुझा तो काढलेला फोटो, मी सारखाच पाहत असतो, तुझी ती गालावरची खळी, खरच वेड लावते मला, माझी जिंदगी आहेस ग, कसं सांगू पिलू तुला, तुझी ती बोलण्याची अदा, मला करते सखे फिदा, असेच करू निर्मळ प्रेम, कधी ही होणार नाही जुदा कवी.सुरज माने.

Wednesday, November 24, 2021

असावी निर्मळ अशी, तुझी नि माझी मैत्री, त्याला कसली बंधने नसावी, असेल माया प्रेम भाव, तरी मनीचा असावा ठाव, त्याला असावे मैत्री हे नाव, मैत्री ही अशी निभवू, जगाला ही दाखवून देऊ, अशी निर्मळ मैत्री ठेऊ. स्वप्नात तू येतेस. स्वप्नात सखे तू येतेस, किती मला छळते,स. गोड गाली हसतेस, सुंदर परी सारखी दिसतेस, बाहुत मला बिलगुन घेतेस, प्रेममय आनंद देतेस, रम्य अशा ठिकाणी नेतेस, गोड गप्पा गोष्टी करतेस, न कळत हसवून जातेस, येता गार वारा सखे, मिठीत मजला घेतेस, तुझ्या प्रेमाचा उबारा मज देतेस, अशीच केव्हा तरी माझ्या स्वप्नात येतेस < किती मला छळते,स. गोड गाली हसतेस, सुंदर परी सारखी दिसतेस, बाहुत मला बिलगुन घेतेस, प्रेममय आनंद देतेस, रम्य अशा ठिकाणी नेतेस, गोड गप्पा गोष्टी करतेस, न कळत हसवून जातेस, येता गार वारा सखे, मिठीत मजला घेतेस, तुझ्या प्रेमाचा उबारा मज देतेस, अशीच केव्हा तरी माझ्या स्वप्नात येतेस

Tuesday, November 23, 2021

मैत्री तुझी माझी ग

माझी प्रिय मैत्रीण, खूप गोड बोलते, माझ्याशी मन मोकळे करते, रोज कॉल मॅसेज करून, माझी विचारपूस करते, ध्यानाने काळजी घे म्हणते, रहावी अशीच मैत्री, स्वच्छ पाण्या सारखी, राहील सदा आहे खात्री, आहे ती चंचल हुशार, माझ्या शी गप्पा मारते खुशाल, अशीच मैत्रीची कायम राहील मशाल.

Friday, November 19, 2021

माझी ताई...उर्मिला ताई..

आहे ती माझी ताई.. स्वच्छ पाण्यासारखी निर्मळ, सर्वात जास्त आहे ती प्रेमळ, सुख दुःखात साथ देते, मन भरून माया ती करते, आनंद मनी भरते, आहे जगाहून न्यारी, माझ्यावर माया करते भारी, माझ्यावर आलेल्या दुःखास ती तारी. अशी आहे माझी रंजू ताई, आनंद मनी ठाई ठाई, आई ची ती माया देई.

Monday, November 15, 2021

प्रेमाची नशा...

अस का होतंय, अस काय आहे तुझ्यात, का होते तुला पाहता, माझ्या काळजाची दशा, अशी अफाट आहे, तुझ्या प्रेमाची नशा, रम्य ठिकाणी अशा, जोडीने जाऊ दोघे, छडेल थंडीत पुन्हा, तुझी मिठीतली प्रेमाची नशा.

Saturday, November 13, 2021

तुला सांगायचं आहे

तुला सांगायचं आहे, मनातील माझ्या सर्व, बोलून टाकायचं आहे, तुला एकांतात भेटायचं आहे, हात हाती घेऊन तुझा, तुझ्यात रमायच आहे, तुझ्याशी खूप बोलायचं आहे, बोलता बोलता तुजला, घट्ट मिठीत घ्यायचे आहे, मिठीत घेऊन तुजला, प्रेम सुख द्यायचे आहे, माझ्या स्पर्शाने तुला लाजवा याचे आहे.

Wednesday, November 10, 2021

शृंगार इतका तुझा...आनंदाचा सागर

नको करुस शृंगार इतका, तुला पाहताच वाजतो, माझ्या हृदयाचा ठोका, तुझ्या गालाची खळी, वेड लावते मला, हळूच येतो मग शहारा मला, लागेल मग गार वारा, चडेल मग दोघांचा पारा, मिलनाचा खेळ सारा, तुझे गुलाबी ओठ, मला सखे खुणावतात, न कळत मजला तुझ पाशी नेतात. आनंदाचा सागर...तुझ्या मिठीत. अशा सांजवेळी सख्या, भेटण्यास तू यावे बहुत सख्या तू मजला, घट्ट सामावून घ्यावे, पाहीन सख्या तुझी वाट, त्या निळ्या रात्रीची, आहे आतुरता मजला, सख्या तुझ्या भेटीची, त्या रात्री तू मजला, भलते इशारे करावे, आनंदाच्या या सागरा त, वाटते तुलाच बिलगून रहावे, क्षण भर का होईना सख्या, दुःख सारे विसरावे, तुझ्याच बाहुपाशात, तुझ्या स्पर्शात न्हाऊन जावे. C.r. सुरज माने.

Monday, November 8, 2021

विसरता आले नाही..

आयुष्यात खूप काही केलं, पण खोटे पना आला नाही, मैत्री केली मी जिवापाड, तुला ती समजली नाही, प्रेम खूप केलं ग मी, तुला ते करता आले नाही, थोडा चुकलो होतो मी, पण तुला सावरता आले नाही, नातं होत आपल जिवाभावाच, पण तुला ते टिकवता आले नाही, ठरवलं विसरून जाईन तुला, पण मला विसरता आलं नाही.

Friday, November 5, 2021

अशी परी आहेस तू,

अशी परी आहेस तू, बघताच क्षणी सखे, मला घायाळ करते तू, आवाज तुझा सखे, जणू कोकिळा वाटते, शब्द तुझे ऐकून मन फुलून जाते, ओठ तुझे गुलाबी, चाल तुझी शराबी, नजर हालत नाही जरा ही, अशी आहेस माझी परी, दिसतेस चंद्रा परी, आहेस माझी दुनिया खरी.

Wednesday, November 3, 2021

चेहरा तुझा निरागस

चेहरा तुझा निरागस, रूप किती ते गोंडस, गाली हास ना थोडंसं, बघताच भरते मनात, तुझाच सुंदर चेहरा, येतो सारखं ध्यानात, रोज स्वप्नात येतेस, गोड गाली हसतेस, वेड मनाला लावतेस, तुझी ती नजरेची अदा, मला करते फिदा, तुझे स्मित हास्य असावे सदा.

Tuesday, November 2, 2021

चेहरा...मुखोटा

चेहरा...खरच चेहऱ्यात काय असते का हो.. ते तुमच्या मनावर असते ,काय असते का नसते हे बघायची.कधी..कोणाचे चेहरे खूप छान असतात..पण ते खरच मनाने आतून छान असतात का.? ते ग्रेट असतात जे चेहऱ्यावर प्रेम करत नाहीत...पण चेहरा पण महत्वाचा असतो. मी एका psaykologist चा शिष्य आहे..manshastr चा अभ्यास...वगेरे..आणि लेखक असल्या मुले..सगळा अभ्यास करावा लागतो.लोक खोटी कशी असतात..कशी होतात. मन कुठे कसं आणि का विचलित होत...अस सर्व बघायचं होतं. आता माझच सांगतो...मी तोच आहे..तसाच जो दिसतो आहे..पण कधी कधी मला खोटं रूप घ्यावे लागते..ते ही खोट्या लोकांसाठीच.. आणि कोणी अशी कोणाच्या चेहऱ्याची टिंगल,चेष्टा मुळीच करू नये..आणि चेहरा किती दिवसाचा असतो हो...झालं 40 गेलं की सुरकुत्या पडतात.....म्हणून..मन चांगले ठेवा.आणि मनाने सुंदर बना..आणि ही ही गोष्ट आहे..तुमचा frd,bf,किती सुंदर handsome असतो पण तो तुमची किंमत करत नाही,दारू,वाईट गोष्टी करतो.असा असतो तो.मग फक्त तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर भाळले असता...धन्यवाद

Monday, November 1, 2021

अशा रम्य ठिकाणी

अशा रम्य ठिकाणी, जाऊ सख्या जोडीनी, फिरू दिस भर हिरवळ राणी, गावू दोघे प्रितीची गाणी. बसून गवतावर त्या, अलगद झुकेन तुझ्या मांडीवर त्या, हात फिरवे न केसात कुरुळ्या तुझ्या, तुझ्या स्पर्शाने सख्या, येईल मला शहारा, देशील ना मला तेव्हा, तुझ्या प्रेमाचा सहारा.

माझी प्रिय मैत्रीण

माझी प्रिय मैत्रीण, खूप गोड बोलते, माझ्याशी मन मोकळे करते, रोज कॉल मॅसेज करून, माझी विचारपूस करते, ध्यानाने काळजी घे म्हणते, रहावी अशीच मैत्री, स्वच्छ पाण्या सारखी, राहील सदा आहे खात्री, आहे ती चंचल हुशार, माझ्या शी गप्पा मारते खुशाल, अशीच मैत्रीची कायम राहील मशाल.

Sunday, October 31, 2021

खोटी मैत्रीण

होतीस मैत्रीण जिवाभावाची, पण तुला किंमत नाही माझी, नुसते खोटं साँग करते, झाली जीवाची लाही

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...